ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

बांगलादेशमध्ये मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली अंतरीन सरकारचा शपथविधी – नव्या सरकारकडून कोणत्याही अपेक्षा नाही बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार सुरूच


ढाका/आज बांगलादेश मध्ये शांततेचे नोबल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली 17 सदस्यांचे अंतिम सरकार स्थापन झालेले आहे या सरकारमध्ये 16 मंत्री असतील मात्र ज्यांनी बांगलादेशमध्ये दंगली घडवल्या हिंदूंना टार्गेट केले ते विद्यार्थी आंदोलनाचे दोन नेते मोहम्मद इनोस यांच्या मंत्रिमंडळात असतील त्यामुळे सरकार जरी आले तरी हिंदूंवरील अत्याचार थांबणार नाहीत त्यामुळेच भारत सरकारने तसे उन्होने या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालावे असे बांगलादेश आणि भारतातील हिंदूंचे म्हणणे आहे
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलन तीव्र होताच शेख हसीना यांनी राजीनामा देऊन बांगलादेश सोडला आणि भारतात येऊन आश्रय घेतला पण बांगलादेशमध्ये लष्कराची सत्ता असतानाही गेल्या चार दिवसांपासून हिंदूंवरील हल्ले सुरूच आहे हिंदूंची मंदिरे तोडली जात आहे तसेच हिंदूंच्या घरांना आणि दुकानांना आगी लावल्या जात आहे त्यामुळे बहुसंख्य हिंदू भारत-बांगलादेशच्या सीमेवर उभे आहेत त्यांना खात्री आहे की आज ना उद्या भारत सरकार आम्हाला आपल्या देशात घेईल परंतु भारत सरकारकडून मात्र अजूनही कोणत्याही प्रकारची हालचाल सुरू झालेली नाही केवळ निषेध करण्यापलीकडे भारत सरकारने काहीही केलेल्या नाही हिंदूंचां पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपाचे केंद्रात सरकार आहे बांगलादेशच्या मुद्द्यावरून लोकसभेत मोठी चर्चाही झाली परंतु सरकारने निर्णय घेतलेला नाही जर सरकारने मनात आणले तर निश्चितपणे हिंदूंचे रक्षण होऊ शकते परंतु अजून पर्यंत तरी भारत सरकारने बांगलादेशच्या विरोधात कठोर भूमिका घेतलेली नाही त्यामुळे भारतातला हिंदू समाज भाजपावर चांगलाच संतापलेला आहे

error: Content is protected !!