ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

118 बडतर्फ एसटी कर्मचार्‍यांना सेवेत घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई- एसटी संपकाळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या 118 एसटी कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे बडतर्फ झालेले 118 कर्मचारी कर्मचारी पुन्हा सेवेत रूजू होणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हे आदेश देण्यात आले.
पगारवाढ आणि एसटी महामंडळाचे विलिनीकरण या मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांनी जवळपास सहा महिने संप पुकारला होता. यावेळी संप मिटवण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी वाटाघाटी करण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही संप सुरुच होता. याच काळात काही एसटी कर्मचार्‍यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला होता. यावेळी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक देखील करण्यात आली होती. त्यामुळे तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आदेशानुसार 118 कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले होते. शिवाय हल्ल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या 118 कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घेण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर आज एसटी महामंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडली. या बैठकीत बडतर्फ करण्यात आलेल्या एसटीच्या 118 कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत रुजू करुन घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे एसटी कामगारांत आनंदाचे वातावरण आहे.

error: Content is protected !!