ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

तर टोल नाके जाळून टाकू – राज ठाकरेंचा सरकारला इशारा

.

मुंबई – राज्यातील टोलनाक्याच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. टोलनाक्याच्या प्रश्नावर सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. तसेच टोल घेतल्यास सगळे टोलनाके आम्ही जाळून टाकू, अशा शब्दांत राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय. दरम्यान आज टोल नाक्यावर आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी अटक केली आहे
“टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याची शहानिशा झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांच्याकडून काय उत्तर येतंय ते पाहू. फडणवीसांनी म्हटल्याप्रमाणे कार, चारचाकी,तीनचाकी आणि दुचाकीला टोल नाहीये, तर आमची माणसं रस्त्यावर उतरतील आणि जिथे टोल घेतला जातोय तेथे हे थांबवले जाईल. आम्हाला विरोध करण्याचा प्रयत्न केला तर असे टोलनाके आम्ही जाळून टाकू. पुढे सरकारला जे करायचं त्यांनी ते करावं.”, असा इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिला आहे.फडणवीस धादांत खोटं बोलतायत

टोलनाक्यावर बोलताना राज ठाकरेंनी अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह देवेंद्र फडणवीसांच्या आतापर्यंत टोल नाक्यावरील वक्तव्यांच्या व्हिडीओ क्लिप सादर केल्या. यातील एक व्हिडीओ क्लिप फडणवीसांच्या कालच्या वक्तव्याची होती. फडणवीसांचा व्हिडीओ प्ले केल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
टोल मुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती त्यानुसार, राज्यातील सर्व टोलवर चारचाकी तसेच दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना मुक्ती देण्यात आलीये. केवळ कमर्शिअल वाहनांवर आपण टोल घेतो.”, असं देवेंद्र फडणवीस रविवारी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले होते.असेही त्यांनी सांगितले

error: Content is protected !!