ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

गरब्यासाठी बनावट पास बनवणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक


मुंबई/बोरवली च्या पश्चिमेस असलेल्या रायगड प्रतिष्ठान आयोजित, रंग रास या गरबा कार्यक्रमाचे सहाशे बनावट पास बनवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सहा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे.
सध्या नवरात्रीनिमित्त सर्वत्र देवीचा जागर सुरू आहे. यात गर्भारासची धूम आहे .मुंबई पुण्यासह अनेक महानगरांमध्ये विविध मंडळे व क्लबच्या माध्यमातून गरबा आणि दांडिया रास खेळाचे आयोजन करण्यात येत आहे. याच खेळांच्या महोत्सवात कुणी बाहेरच माणूस येऊ नये किंवा अज्ञात इस्मानी सहभागी होऊ नये म्हणून शक्य ती खबरदारी घेतली जात आहे त्यासाठी तिकीट किंवा पासेस देऊन इंट्री दिली जाते. मात्र मुंबईतील काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या गरबा उत्सवात स्कॅम करून पैसे कमावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी बनावट पासेस तयार करून विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईच्या बोरवली पश्चिमेत गरबाचा पास बनवणाऱ्या सहा जणांच्या टोळीला बोरवली पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले सर्वजण कॉलेजचे विद्यार्थी असून त्यांनी लाखो रुपये कमावण्याची योजना या माध्यमातून तयार केली होती. मात्र त्यांची ही योजना फेल गेली अटक केलेल्यांमध्ये मनोज चावडा ,हितेश नागर, भव्य जितेंद्र मकवाना, राज शैलेश भगवान यश राजू मेहता, आणि केयूर जगदीश नाईक यांचा समावेश आहे हे सगळे १८ते २० व्या वयोगटातील असून हे सर्व कॉलेजेस शिकणारे आहेत. या सर्वांनी वाटलेल्या पासवर बारकोड होते परंतु गरबा मैदानात प्रवेश करण्यापूर्वी सिक्युरिटी जवळ बारकोड त्या न झाल्याने सिक्युरिटी ला संशयाला आणि हे बनावट पासवाले पोलिसांच्या जाळ्यात सापडले.

error: Content is protected !!