राजकीय बॉम्ब हल्ल्यात फडणवीसांचा बार फुसका- उद्या मलिक हायड्रोजन बॉम्ब टाकणार
मुंबई / महाराष्ट्रात एकीकडे अतिवृष्टी मुले बरबाद झालेला शेतकरी मदतीसाठी सरकारकडे डोळे लावून बसला आहे तर दुसरीकडे सरकार आणि विरोधी पक्षात बॉम्ब वार सुरू आहे आज फडणवीसांनी मलिक आणि अंडरवर्ल्डचा संबंधाबाबत धमाका केला मात्र तो फुसका असल्याचे सांगून आपण बुधवारी हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे मलिक यांनी जाहीर केले आहे .
काल फडणवीस यांनी मालिकांवर बॉम्ब टाकताना कुर्ल्यातील एल बी एस मार्गावरील तीन एकर जागा मालिकांचां नातेवाईकांनी कवडीमोल भावाने विकत घेतली आणि तीही बॉम्ब स्फोटातील जन्मठेप झालेल्या आरोपी शहा वली खान याच्याकडून आणि या व्यवहारात हसीना पारकर हीचा वाहन चालक सलीम पटेल हा सुधा होता अशा पद्धतीने फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला त्यावर पलटवार करताना मलिक यांनी सांगितले की सलीम पटेल किंवा शहा वली खान याच्याशी आमचा काहीच संबंध नाही त्याचा बाप गोवावला कंपाऊंड मध्ये वाच मन होता आणि त्याने त्यातल काही जागेच्या सातबारावर आपले नाव चढवून घेतले ते काढण्यासाठी आम्ही त्याला पैसे दिले असा खुलासा करून नवाब म्हणाले की फडणवीस यांच्या खबरी लोकांनी त्यांना व्यवस्थित माहिती दिली नाही आमचे सर्व व्यवहार चोख आहेत मात्र आता मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडून फडणवीस आणि अंडरवर्ल्ड यांच्या संबंधांची माहिती देशासमोर ठेवणार आहे असे त्यांनी जाहीर केले