माहीम मध्ये उद्धव ठाकरेंची सभा नाही तर वरळीच्या सभेत राज ठाकरेंचे आदित्य बाबत मौन
मुंबई/यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची मनसे स्वबळावर लढते तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आहे मात्र यांच्यात जरी कितीही राजकीय मतभेद असले किंवा काही प्रमाणात कौटुंबिक बाबतीत एक वाक्यता नसली तरी एकमेकांना मदत करण्याचे धोरण मात्र कायम आहे कारण आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही ठाकरे उभे असलेल्या माहीम मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरेंचा भलेही उमेदवार असला तरी त्यांनी माहीम मध्ये सभा घेणार नाही असे सांगून अप्रत्यक्षपणे आपल्या पुतण्या अमित ठाकरे यांना मदत केली आहे तर दुसरीकडे राज ठाकरेंची वरळीत जाहीर प्रचार सभा झाली परंतु या सभेत त्यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर भलेही टीका केली असली तरी पुतण्या आदित्य ठाकरे यांच्या बाबत मात्र तोंडातून एक शब्दही काढला नाही याचाच अर्थ ठाकरे बंधूंमध्ये अप्रत्यक्षपणे का होईना कुठेतरी समजवता झाला आहे अशी चर्चा मतदारांमध्ये आहे.
मुंबईमध्ये मनसेने भलेही स्वबळावर अनेक जागा लढवलेले असल्या तरी त्यांचा फोकस वरळी शिवडी आणि माहीम मतदारसंघांवर आहेत शिवडी मध्ये बाळा नांदगावकर यांच्यासाठी यापूर्वीच राज ठाकरेंची भाजपा बरोबर सेटिंग झाली आहे असे बोलले जाते त्यामुळे भाजपा शिवडी मध्ये बाळा नांदगावकर यांना मदत करणार आहे तर माहीम मध्ये राज ठाकरेंची पुत्र अमित ठाकरे यांच्याविरुद्ध शिवसेनेचे महेश सावंत आणि शिंदे सेनेचे सभासर्वणकर उभे आहेत अमितला निवडणूक सोपी करण्यासाठी सदा सर्वनकरांना माघार घेण्याबाबत अनेक प्रयत्न झाले .पण ते काही ऐकले नाहीत त्यामुळे आता इथे तिरंगी लढत होणार आहेत.