ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

वार्ड फेर रचनेच्या विरोधात भाजप नगरसेवक न्यायालयात

मुंबई/ राज्य सरकारने नुकतीच मुंबई महापालिका क्षेत्रातील वार्ड ची जी फेररचना करून वार्ड ची संख्या वाढवली आहे त्याच्या विरोधात अभिजित सामंत आणि राजश्री शिरवाडकर या दोन भाजप नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेतली असून त्यावर गुरुवारी सुनावणी आहेे.
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन वार्ड फेर रचना करून ९ वार्ड वाढवले.त्याला भाजपने विरोध केला आहे. भाजपच्या नगरसेवकांचे म्हणणे आहे की २०१७ साली जन गणना झाली आहे . तेंव्हापासून २२७ वार्ड आहेत त्यात आणखी ९ वार्ड कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करून अभिजित सामंत आणि राजश्री शिरवाडकर या दोन भाजप नगरसेवकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी असून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!