ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

गुजरातमध्ये भाजपचा रेकॉर्डब्रेक विजय – पण हिमाचलमधील सत्ता गेली

गांधीनगर – गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने १५६ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले आहे तर काँग्रेसला अवघ्या १७ जागा मिळाल्याने त्यांचा सुपडा साफ झाला आहे. गुजरातमध्ये सरकार बनवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या आम आदमीला केवळ ५ जागा मिळाल्या . दरम्यान गुजरातमध्ये भाजपने जरी आपली सत्ता कायम राखली तरी हिमाचल प्रदेश मधील भाजपची सत्ता मात्र काँग्रेसने हिसकावून घेतली . हिमाचल मध्ये ६८ पैकी काँग्रेसने ४० जागा जिंकून बहुमत मिळवले आहे तर भाजपला केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे तिथले भाजपचे सरकार पडले असून काँग्रेस पुन्हा सतेत आली आहे.
गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबर अशा २ टप्प्यात १८२ जागांसाठी निवडणूक झाली होती . त्याचा आज निकाल लागला आणि भाजपने १५६ जागा जिंकल्या. तर काँग्रेसने ५० जागा गमावल्या आपलाही सुपडा साफ झाला . या निवडणुकीत क्रिकेटर रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा हि जामनगर पश्चिम मतदार संघातून विजयी झाली तर र्मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल २ लाख मतांनी विजयी झाले बहुचर्चित पाटीदार नेता हार्दिक पटेल हा सुद्धा निवडून आला असून १२ डिसेंबरला भूपेंद्र पटेल दुसऱ्यानंद मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील ..

error: Content is protected !!