ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

काळू बाई सह सर्व यात्रा रद्द

सातारा/ सध्या देशात कोरॉनाच्य तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून त्याचा प्रमुख हॉट स्पॉट महाराष्ट्र ठरतोय कारण महाराष्ट्रात दिवसाला ४० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत म्हणूनच महाराष्ट्र सरकारने आज पासून राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत त्यात दिवसाची जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी चां समावेश आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेव येथील काळूबाई ची यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे तर फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या आंगणेवडी आणि कुणकेश्वर यंत्रांच्या बाबतीत सुधा संभ्रम असून या यात्रा रद्द होण्याची शक्यता आहे
सातारा जिल्ह्यातील मांढरदेव डोंगरावर जानेवारी मध्ये काळू बाई देवीची यंत्र भरते संपूर्ण महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या राज्यातील ८ ते १० लाख भाविक या यात्रेला येतात पण काही भाविक १० दिवस अगोदरच येथे येवून मुक्काम ठोकतात तर काही जण यात्रा संपल्या नंतरही येथे बरव काळ थांबतात यंदा सुधा १७ जानेवारीपासून ही यात्रा सुरू होणार होती पण कोरोनाचे तसेच ओमीक्रोनचे रुग्ण सुधा सापडत आहे त्यामुळे सरकारने दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लावली आहे हे पाहून सातारा जिल्हा प्रशासनाने मांढरदेव परिसरात आजपासून कलम १४४ लावले आहे आणि म्हणूनच मांढरदेव येथील काळूबाई देवीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे तसेच या वर्षी महाराष्ट्रातील काशी अशी ओळख असलेल्या सिंधू दुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील आंग्णेवडी येथील भराडी देवीची यात्रा सुद्धा रद्द होण्याची शक्यता आहे तर देवगड तालुक्यातील कुणकेश्वर यात्राही रद्द होण्याची शक्यता आहे

error: Content is protected !!