आज सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षावर सुनावणी
दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार असल्याने संपूर्ण देशाचे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.शिवसेनेने या प्रकरणी ७ न्यायमूर्तींच्या घटना पीठाकडे प्रकरण सोपवण्याची मागणी केली आहे ती मेनी होते कि नाही ते आज कळणार आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र करावे अशी मागणी तत्कालीन सभापतींकडे केली होती ती सभापतींनी मेनी केलीp तर शिंदे गटाने बहुमताच्या जोरावर सभापतींवरच अविश्वासाचा ठराव आणला होता यामुळे अविश्वासाचा ठराव आलेल्या सभापतीला १६ आमदारांना अपात्र ठरवता येत नाही असे शिंदे गटाचे म्हणणे होते अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले तिथे हे प्रलंबित आहे. मधल्या काळात शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हांवरूनही वाद झाला मात्र न्यायालयाने हे प्रकरण निवडणूक आयोग कडे सोपवले त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्र सादर करण्याचे आदेश देऊन धनुष्यबाण चिन्ह गोठवले आणि ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव दिले तर शिंदे गटाला वेगळे चिन्ह आणि बाळासाहेबांची शिवसेना असे नाव दिले या सर्व प्रकरणावर आज सुनावणी आहे .