नवी मुंबईत मनसेच्या २ गटात राडा
नवी मुंबई – माथाडी कामगार आणि मनसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला. खारघर मधील मेडिकव्हर रुग्णालयाच्या बाहेर मोठा राडा झाला. माथाडी कामगाराचे नेते महेश जाधव या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या समर्थकांसाठी मनसैनिकांना पळवून हाणले. मनसे नेते अमित ठाकरे यांनी शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचा आरोप जाधव यांनी केला. महेश जाधव हे मनसेचे उपाध्यक्ष आणि मनसे माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष आहेत.
मनसेचे माथाडी कामगार नेते असलेले महेश जाधव यांनी थेट अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महेश जाधव यांच्यावर सध्या खारघर मधील मेडिकव्हर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या मनसैनिकांना जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. एका सोसायटीमध्ये लपायला गेले असता सोसायटीच्या सिक्युरिटी रूमच्या काचा माथाडी कामगारांनी फोडल्या. मनसेच्या दोन गटात झालेल्या या मारहाणीमुळे खारघर परिसरात काहीसे तणावाचे वातावरण आहे.
