औरंगाबाद मध्ये वचीतच्या मोर्चा सह अनेक ठिकाणी आंदोलने हिजाबचा वाद पेटला
मुंबई/ कर्नाटकातील उडिपी मध्ये हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्याच्या प्रकरणाचे देशभर तीव्र पडसाद उमटत आहेत .महाराष्ट्रात बीड,मालेगाव ,मुंबई तसेच इतर शहरांमध्ये ही मुस्लिम महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. तर काल औरंगाबाद मध्ये मुस्लिम महिलांना पाठिंबा देण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडी तर्फे मोर्चा काढण्यात आला त्यात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या तर हे प्रकरण न्याय प्रविष्ट असून कर्नाटक उच्च न्यायालयाने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवले आहे.
उडपी येथील महा विद्यालयाने ड्रेस कोडचा बहाणा करून हिजब घालून येणाऱ्या मुलींना महाविद्यालयात येण्यापासून रोखले होते त्यामुळे या विद्यार्थिनी न्यायालयात गेल्या होत्या तर दुसरीकडे हिंदू संघटनांनी हिजब्ला विरोध करताना त्यांनी हीजाब घातला तर आम्ही भगवे फेटे आणि उपरणे घालून येऊ असे म्हणत काही विद्यार्थी कॉलेज परिसरातभगवे स्कार्फ घालून असेल आणि जय श्रीरामाच्या घोषणा देऊ लागले यावेळी तेथे हजर असलेली मुस्कान या विद्यार्थिनीने अल्लाह हु अकबराच्या घोषणा दिल्या त्यामुळे वातावरण तापले दरम्यान हा वाद कर्नाटकच्या इतर भागातही पसरल्याने कर्नाटक सरकारने तीन दिवस शाळा कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश दिलेत तर या प्रकरणाचे पडसाद मुंबई सह महाराष्ट्राच्या इतर भागात उमटले बीड मालेगाव मध्ये मुस्लिम महिलांनी मोर्चे काढले तर काल औरंगाबादमध्ये वांचित्ने मोर्चा कडून कर्नाटक सरकारं आणि मुख्यमंत्री बॉम्माई यांचा निषेध केला मुंबईत मुस्लिम महिलांनी सह्यांची मोहीम राबवली देशाच्या इतर भागातही वातावरण तापले आहे