हिजाब चां धार्मिक स्फोट
या देशाची धर्माच्या आधारे फाळणी झालेली आहे .आणि फाळणीच्या वेळेस हिंदू मुस्लिम दंगलीत किती लोक मेले याचा हिशोब नाही.कारण धर्म ही तेंव्हाही अफूची गोळी होती आणि आताही आहे धर्माचं वेड डोक्यात शिरल की मग माणसाचा फालतू धार्मिक अभिमान जागा होतो आणि त्याला व्होट बँकेचं राजकारण बनवून पुढारी लोक आपली पोळी भाजून घेतात लोकांना हे सगळ दिसत असताना समजत असताना पुन्हा पुन्हा जात धर्म यावरून का या देशात तणाव निर्माण केला जातो तेच काळात नाही .सध्या मुस्लिम विद्यार्थिनींच्या हिजब वरून देशातील वातावरण तापेले आहे आणि पाच राज्यांच्या निवडणुकीच्या परचारार्त जा हीजाब पेट्रोल ओतण्याचे काम करीत आहे. कर्नाटकातील उडीपी येथील एका कॉलेजात हिजान घालून आलेल्या मुलींना रोखण्यात आले त्यामुळे त्या मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे इतपर्यंत सगळ ठीक आहे पण मुस्लिम मुलींच्या हीजब विरुद्ध हिदू मुलांनी गळ्यात भगवे पट्टे घालून शाळेत येण्याचा जो निर्णय घेतला आहे तो चिंताजनकआहे कारण हा वाद पेटल्या नंतर हिंदू तरुण जय श्रीरामाचे चां घोषणा देत होते तर मुस्लिम तरुणी अल्ला हो अकबर चे नारे डॉट होते त्यामुळे अशा परस्पर विरोधी नारेबाजी मुले हिंदू मुस्लिम दंगली घडू शकतात.त्यामुळे हे सगळ आता कायद्याने नाही तर पॉलिसी बळावर थांबवण्याची वेळ आलेली आहे
लोकांना हे कसं काळात नाही की शैक्षिणक जीवन हा आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा आहे निदान तिथे तरी धार्मिक तणाव निर्माण व्हायला नको कारण शाळा कॉलेजातील विद्यार्थी विद्यार्थिनी हे भरताच भविष्य आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना धार्मिक वादपासून दूर ठेवायला हवं.अन्य था त्याचे देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील.कारण कर्नाटकातील हिजन प्रकरणाचे आता देशभर पडसाद उमटल लागलेत मुंबईत मुस्लिम महिलांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे तर बीड आणि मालेगाव मध्ये मुस्लिम महिलांनी राष्ट्रवादीच्या सोबत मोर्चे काढले देशाच्या इतर भागात सुध वातावरण तणावपूर्ण आहे.पण पंतप्रधान मोदी आणि इतर नेत्यांना पाच राज्यातील निवडणूक परचारची पडली आहे देश खड्ड्यात गेला तरी चालेल .जातोय दंगलीत लोक मेले तरी चालतील पण पाच राज्यात भाजपला सत्ता स्थापन करायची आहे. त्यामुळे हिजाब प्रकरणाचा प्रत्येक पक्ष आपल्याला कसा फायदा होईल याच्या विचारात आहे.किती भयंकर आहे हा सगळा प्रकार!जर हे थांबले नाही तर हिंदू मुस्लिम तरुण तरुणी रस्त्यावर उतरून एकमेकांची डोकी फोडतील देशात रक्ताचे पाट वाहतील कारण जेंव्हा कुठल्याही आंदोलनाची सूत्रे तरुणांकडे जातात ते आंदोलन हिंसक बनते आणि दोन समाजातील दरी आणि तणाव वाढवण्यास कारणीभूत ठरते .कर्नाटकातील भाजपा सरकारला आताच ड्रेस कोडची आठवण कशी काय झाली? कारण यापूर्वी जेंव्हा मुस्लिम मुली हीजब घालून येत होत्या तेंव्हा त्यांना कुठे विरोध झाला नाही मग आताच ही खाजवून खपली का काढली जातेय आणि केंद्र सरकार गप्प का ? हेच जर महाराष्ट्रासारख्या विरोधी पक्षाच्या राज्यात घडले असते तर भाजप वाल्यांनी थयथयाट केला असता मग आता शेटजी आणि भटजी गप्प का? याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे या देशात एक असाही वर्ग आहे जो जात धर्म मनात नाही आणि असे लोक हिंदू व मुस्लिम दोन्ही समाजात आहेत आता त्यांनीच या प्रश्नावर उठाव करून दोन्ही धर्मातील कट्टर पंथीयांच्या विरोधात आवाज उठवायला हवा