अडाणी समूहाला मोठा झटका नार्वे वेल्थ फंडाने सर्व शेअर विकले
नॉर्वे वेल्थ फंडचे ईएसजी रिस्क मॉनिटरिंग हेड ख्रिस्टोफर राइट यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले की, मागील वर्ष संपल्यानंतर आम्ही अदानी समूहातील कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करत होतो आणि आता या कंपन्यांमध्ये आमची कोणतीही गुंतवणूक नाही. त्यांनी पुढे सांगितले की, आमच्याकडून अदानी समूहाच्या कंपन्यांवर ईएसजी शी निगडीत मुद्यांवर मागील काही वर्षापासून देखरेख करण्यात येत होती. ईएसजी म्हणजे, पर्यावरणसामाजिक आणि शासन संबंधित मुद्यांच्या समावेश आहे.
नॉर्वे वेल्थ फंड जगभरातील ९२०० कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करते. जगातील शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांमध्ये १. ३ टक्के शेअर्स आहेत. हा फंड नॉर्वे सरकारशी संबंधित असून केंद्रीय बँकेकडून याचे व्यवस्थापन केले जाते.
अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर, अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात मोठी घसरण सुरू झाली. त्यानंतर अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्स अॅण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या शेअर दरात काही दिवस तेजी दिसून आली होती. मात्र, आज गुरुवारी अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. आज, अदानी टोटल गॅस तिमाही कंपनीचे तिमाही निकाल जाहीर झाले. तिमाही निकाल चांगले असूनदेखील एनएसईवर कंपनीच्या शेअर दरात टक्क्यांची घसरण दिसून आली.
अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर दरात मोठी घसरण दिसून आली. आज, या कंपनीचा शेअर दर 10.७२ टक्क्यांच्या घसरणीसह १९२७. ३० रुपयांवर स्थिरावला. कंपनीचा मार्केट कॅप आता २,१९,१७४२ रुपये इतका झाला आहे. अदानी पोर्ट्सच्या शेअर दरात २. ९० टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. या कंपनीचा शेअर दर ५८२. ०५ रुपयांवर स्थिरावला. अदानी पॉवरच्या शेअर दरात आज लोअर सर्किट लागला. अदानी पॉवरचा शेअर दर १७२. ९० रुपयांवर स्थिरावला. अदानी ट्रान्समिशनमध्येही लोअर सर्किट लागला. या कंपनीचा शेअर पाच टक्क्यांच्या घसरणीसह १२४८. ५५ रुपयांवर स्थिरावला.