ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

पुणे पोटनिवडणुकीत अमित शहांची एंट्री

पुणे -कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा येणार आहेत १८, आणि १९ फेब्रुवारीला ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतील
भारतीय जनता पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मैदानात भाजपचे ‘चाणक्य’ अशी ओळख असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मैदानात उतरणार आहेत. येत्या १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी ते पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा पुणे दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असून निवडणुकीसाठीच या दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची चर्चाही सुरू झाली आहे.

अमित शहा १८ आणि १९ फेब्रुवारीला पुण्यात आहेत. अमित शहा यांच्या हस्ते ‘मोदी ॲट ट्वेन्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तर १९ फेब्रुवारी रोजी अमित शहा बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीत आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ‘मोदी ॲट ट्वेन्टी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मोठा सार्वजनिक कार्यक्रम भाजपकडून आयोजित करण्यात येणार आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे रासने तर चिंचवड मधून भाजपच्या अश्विनी जगताप निवडणूक लढवीत आहेत

error: Content is protected !!