ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

चंदगड तालुका पंचक्रोशी को. ऑप.क्रेडिट सोसायटी निवडणुकीत सत्ताधार्‍याचा विजय

मुंबई/ कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील जनतेच्या विकासात मोठे योगदान असलेल्या चंदगड को.ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत 1410 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीत सत्ताधारी कै.सटूपा रवळू करबंळकर पॅनल विरूद्ध श्री.रवळनाथ परिवर्तन सहकारी पॅनल यांच्यात सरळ लढत झाली.
मात्र निकाल सत्ताधारी करंबेळकर पॅनलच्या बाजूने लागला असून त्यांनी 10 पैकी 10 जागा जिंकल्या असल्या तरी सोसायटीचे बरेच सभासद संचालकांवर नाराज असल्याचे मत विरोधकाचे आहे. त्यांच्याकडून ज्या पद्धतीने सोसायटीच्या सभासदांना सहकार्य मिळायला हवे होते तसे मिळत नाही. त्यामुळेच श्री.रवळनाथ सहकारी पॅनल बद्दल सोसायटीच्या सभासदांना सहानुभूती आहे. या पॅनलचे प्रमुख संभाजी गावडे, अशोक गावडे, नारायण पाटील, बाळू अडसूळ यांनी मेहनत घेतली. प्रतिक्रीया देताना म्हणाले जरी सत्ताधारी पॅनलने विजय मिळवला असला तरी त्यांना यापुढे मनमानी कारभार करायला देणार नाही. लोकशाही माध्यमातून सत्ताधारी संचालकांना वेळोवेळी जाब विचारला जाईल.

error: Content is protected !!