वॅलेन्टाईन डेला गायीला मिठी मारण्याचा आदेश मागे
मुंबई – हिंदुत्वाचाअजेंडा राबवताना काहीही निर्णय घ्यायचे आणि नंतर लोकांकडून विरोध झाल्यावर माघार घ्यायची यामुळे सरकारच्या विश्वसनीयतेलाच कुठेतरी तडा जातो.असाच काहीसा प्रकार वॅलेन्टाईन डेला गायीला मिठी मारण्याच्या आदेशाबाबत झाला आहे. सरकारच्या या निर्णयाचे जण माणसात हसे होताच हा निर्णय मागे घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे
‘व्हेलेंटाईन डे’च्या दिवशी गाईला मिठी मारून साजरा करावा असा आदेश केंद्र सरकारने आज मागे घेतला आहे. गाईला फेब्रुवारी रोजी मिठी मारावी असा आदेश सरकारने काढला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात सोशल मीडियावर टीकेचे सूर उमटू लागले होते. या आदेशाविरोधात मीम्सचा पूर सोशल मीडियावर आला होता. त्यानंतर आज सरकारकडून चार ओळींचे पत्रक काढत आदेश मागे घेत असल्याची माहिती देण्यात आली.
भारतीय पशू कल्याण मंडळाने १४ फेब्रुवारी रोजी गाईला मिठी मारण्याचा आदेश पशूसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या आदेशानुसार मागे घेण्यात आला.
अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाच्यावतीने १४फेब्रुवारी रोजी व्हेलेंटाइन डे ऐवजी साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. हा निर्णय हास्यास्पद असल्याचे अनेकांनी म्हटले. तर, काहींनी या निर्णयावर तिरकस भाषेत टिप्पणी केली होती. गाईला मिठी मारण्यासाठी १४ फेब्रुवारीच का, इतर दिवस का नाही? असा प्रश्नही सोशल मीडियावर उपस्थित करण्यात आला होता. या निर्णयानंतर सोशल मीडियावर मीम्सची लाट आली. गाईला मिठी मारल्याने भावनात्मक समृद्धी येईल असा तर्क देण्यात आला होता. सर्व गाईप्रेमींनी १४ फेब्रुवारी हा दिवस गाईचे महत्त्व लक्षात घेऊन आणि जीवन आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण बनवून गायींना मिठी मारून हा दिवस साजरा करावा,” असे पशू कल्याण मंडळाने आपल्या आदेशात म्हटले.