ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

अभिषेक घोसाळकर हत्येमागची धक्कादायक कारणं पुढे येतील – मोरीसच्या अंगरक्षकाला अटक

मुंबई : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालं असून त्यांच्या धाकट्या भावाने त्यांना अग्नी दिला. यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं दिसून आलं. अभिषेक घोसाळकर यांची मॉरिन नोरोन्हा या व्यक्तीने गुरूवारी संध्याकाळी गोळ्या घालून हत्या केली होती.
उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आज विनोद घोसाळकर यांच्या घरी भेट दिली आणि त्यांचं सात्वन केलं.
अभिषेक घोसाळकर आणि नोरोन्हा गुरूवारी संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते. लाईव्ह संपत आलं तेव्हा मॉरिस खोलीतून बाहेर गेला, त्यानं पिस्तुल काढलं आणि पुन्हा खोलीत शिरुन घोसाळकरांवर गोळीबार केला. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
अभिषेक घोसाळकरांची हत्या ज्या पिस्तुलानं झाली, ते पिस्तुल मॉरिस नोरोन्हाचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राचं होतं. मिश्राला आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं. तब्बल दहा ते बारा तास चौकशी केल्यावर मिश्राला क्राईम ब्रँचनं अटक केली आहे. त्याला शनिवारी सकाळी बोरिवली कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात मॉ़रिसशी निगडित तिघांना जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यामध्ये अंगरक्षक अमरीश साहू, सहकारी रोहित साहू, पीए मेहुल पारिख, मॉरिसचा कार ड्रायव्हर यांचा समावेश आहे. त्यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे. ज्या पिस्तुलानं हत्या करण्यात आली, ते पिस्तुल अंगरक्षण अमरीश मिश्राचं होतं. त्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी परवाना दिला होता.
हत्येत या तिघांपैकी कुणाचा समावेश होता का, याचा तपास पोलीस करतायेत. महत्त्वाची बाब म्हणजे मॉरिसच्या पत्नीकडून पोलिसांनी मोलाची माहिती मिळतेय. मी अभिषेक घोसाळकरचा बदला घेणार असं मॉरिस वारंवार म्हणायचा, असं त्याच्या पत्नीनं सांगितलं.
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमागची धक्कादायत कारणं आता समोर येत आहेत. बदल्याची भावना, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्यासाठी हा खून झाला असं पोलीस तपासातून स्पष्ट होतंय. मारेकरी मॉरिसनं अतिशय थंड डोक्यानं हत्येचा प्लॅन बनवला. त्यासाठी आधी भांडण असलेल्या अभिषेक घोसाळकरांशी जवळीक वाढवली, त्यांच्या विश्वास जिंकला आणि मग त्या भयावह क्षणी घोसाळकरांचा जीव घेतला. हे सगळं एखाद्या क्राईम वेब सीरिजच्या वेब सीरिजपेक्षाही भयानक आहे. राग आणि सूड या दोन भावना किती मोठा घात करू शकतात, हे या हत्येमधून पुन्हा अधोरेखित झालं

error: Content is protected !!