दिल्लीत सत्तांतर आम आदमी पक्षाचे सरकार जाऊन भाजपाचे सरकार आले केजरीवाल स्वतः पराभूत
दिल्लीत सत्तांतर आम आदमी पक्षाचे सरकार जाऊन भाजपाचे सरकार आले केजरीवाल स्वतः पराभूत
नवी दिल्ली/दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सत्ताधारी आम आदमी पक्षाचा पराभव करून दिल्ली विधानसभेवर आपला झेंडा फडकवला या निवडणुकीत प्रथमच एक्झिट पोलवाल्यांचे अंदाज खरे ठरले आणि 27 वर्षानंतर दिल्लीत भाजपचे सरकार आले
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले नवी दिल्ली मतदार संघातून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा साडेचार हजार मतांनी पराभव झाला या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते साहेब सिंग वर्मा यांचा मुलगा निवडून आला तर दुसऱ्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित याच्या मुलाचा डिपॉझिट जप्त झाले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांचा पडपड गंज मतदार संघात 606 मतांनी पराभव झाला सत्यन्द्र जैन यांचाही पराभव झाला मात्र दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या अतिशा निवडून आल्या दरम्यान भाजपाकडे निर्विवाद बहुमत असल्याने त्यांना इतर कुठल्याही पक्षाची आता गरज नाही त्यामुळे दिल्लीत भाजपाचे स्वबळाचे सरकार येणार आहे तर मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर मुख्यमंत्री पदाची निवडणूक होणार आहे तरीही मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीत भाजपामध्ये लॉगिन सुरू आहे आता या लॉगिन मध्ये कोण बाजी मारतो ते लवकरच कळेल
