ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

विरोधकांमध्ये फूट भाजपने केली मतांची लय लूट


पाच राज्यांच्या विधासभां निवडणुकीचा निकाल लागला.आणि उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली.तर विरोधकांमध्ये जी फाटाफूट आहे त्याचा अर्थातच भाजपला फायदा झाला .भलेही यावेळी त्यांच्या जागा कमी झाल्या असल्या तरी त्यांना 250 पेक्षा अधिक जागांचे बहुमत मिळालेले आहे. तर समाजवादी पक्षाने 2017 पेक्षा यंदा जबरदस्त यश मिळवले आहे 2017 च्या निवडणुकीत सपाला अवघ्या 47 जागा मिळाल्या होत्या यावेळी सव्वाशेच्या आसपास जागा मिळाल्या आहेत जर सगळे विरोधक भाजपच्या विरोधात एकत्र लढले असते तर युपी मध्ये नक्कीच सत्तांतर झाले असते या निवडणुकीत काँग्रेस सारख्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाला दोन आकडी संख्याही गाठता येऊ नये हे खरोखरच विचार करण्यासारखे आहे.याचा अर्थ विरोधी आघाडीत काँग्रेसला कुणी घ्यायला तयार नाहीत ते बरोबरच आहे.कारण काँग्रेस आज पूर्णपणे रसातळाला गेली आहे. पंजाब मध्ये सता असताना तिथे नेमके काय करायला हवे हेच काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींना शेवटपर्यंत कळले नाही त्यामुळे त्यांच्यातून पंजाब गेला.मुख्यमंत्री दोन्ही मतदार संघातून पर्भुत झाले यापेक्षा दुर्दैव कोणते? सिंदउ सारख्या मूर्ख आणि बोलघेवड्या माणसाच्या हातात पंजाब काँग्रेसची सूत्रे दिल्यामुळेच पंजाबमध्ये काँग्रेसचा पराभव झाला

: उतरा खंड,गोवा,आणि मणिपूर मध्ये भाजपने मुसंडी मारली आहे तिथेही विरोधी पक्ष अपयशी ठरला आहे.त्यामुळे देशातील जनतेच्या मनात विरोधी पक्षा बाबत नेमकि कोणती भावना आहे तेच या निकालाच्या वरून दिसतेय.मोदींनी काही चुकीचे निर्णय घेतले जे जनतेला पटले नाहीत तरी सुधा लोक मोदींवर आणि भाजपा वराच का विश्वास दाखवत आहेत याचा विरोधकांनी विचार करायला हवा.गोव्यात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना इतका गर्व झाला होत की. आम्ही स्वबळावर निवडणुका सहज जिंकू असे त्यांना वाटत होते म्हणून त्यांनी कुणाशी युती केली नाही आत्ता त्यांना आपल्या चुकलेल्या निर्णयाचे परिणाम भोगावे लागत आहेत.विरोधकांचे आप आपसतले मतभेद हाच भाजपचा प्लस पॉइंट आहे त्यामुळे 2024 क्या निवडणुकीत सुधा विरोधकांचे काही खरे नाही .कारण एकमेकांच्या पायात पाय अडकवणाऱ्या विरोधकांवर देशातील जनतेचा विश्वासाचं राहिलेला नाही त्यामुळे या अठरापगड चिंधी चोरांपेक्षा मोदी बरे असेच लोकांना वाटत आहे .त्यामुळेच लोक मोदींच्या बाजूने जात आहेत पण मोदी आणि त्यांच्या पक्षाला हरवणे कठीण नाही हे केजरीवाल यांनी दोन वेळा दाखवून दिले आणि आता स्वबळावर पंजाब जिंकला याला म्हणतात निर्धार!

error: Content is protected !!