ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

दर पंधरा दिवसांनी प्रत्येकाचे काम तपासणार राज ठाकरे यांची मनसे पदाधिकाऱ्यांना तंबी


मुंबई/लोकसभा निवडणुकीतील माघार आणि विधानसभा निवडणुकीत आलेले अपयश यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेतृत्व काहीसे अस्वस्थ आहे म्हणूनच मनसेने आता आगामी महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे चिंचवड येथे झालेल्या मनसेच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की दर पंधरा दिवसांनी पदाधिकाऱ्यांचे काम तपासणार आणि जो कोणी कामात हलगर्जीपणा करील त्याला पदावरून काढून टाकणार राज ठाकरे यांच्या या तंबी मुळे मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी घबराहाट माजली आहे
मनसेच्या 19 व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी चिंचवड येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात भाषण करताना राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले होते त्यांनी सांगितले की संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या पक्षाची संघटना आहे तरीसुद्धा म्हणावे तेवढे यश मिळत नाही त्याचा अर्थ काय ज्या लोकांना पदे देण्यात आली आहेत त्यांनी पक्षाचा जनाधार वाढवणे आवश्यक आहे लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे पक्षाचे काम व्यवस्थित करणे आवश्यक आहे तसे न झाल्यास मी कठोर निर्णय घेण्यास मोकळा आहे म्हणूनच यापुढे दर पंधरा दिवसांनी पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेणार आणि जो कोणी काम करीत बसल्याचे आढळून आले तर त्याचे पद काढून घेतले जाईल अशी तब्येत राज ठाकरे यांनी दिली त्यामुळे भविष्यात मनसेचे कार्यकर्ते आणखी जोमाने पक्षासाठी काम करतील आणि आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून देतील अशी आशा व्यक्त केली जात आहे

error: Content is protected !!