ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

दक्षिण मुंबईत पुन्हा बेकायदेशीर पार्किंग वसुली सुरू


मुंबई/ पे अँड पार्क ची कंत्राटे सह महिन्यापूर्वीच संपलेली आहेत तरीही चर्चगेट,नरिमन पॉइंट,सी एस टी मरीन लाईन या भागातील वाहन तलांचा ताबा काही गुंडांनी घेतलेला असून त्यांच्या कडून बेकायदेशीर पार्किंग चार्ज वसूल केला जातोय काही ठिकाणी पावत्याही दिल्या जात नाही तर काही ठिकाणी या लोकांनी बनावट पावत्या बनवून वसुली सुरू केली आहे दुचाकी वाहनांसाठी 20 ते 50 रुपये तर चारचाकी वाहनांसाठी 150 ते 200 रुपये वसूल केले जात आहेत दक्षिण मुंबईत 50 सार्वजनिक वाहण तळ असून तिथली पे अँड पार्कची कंत्राटे बेरोजगार आणि महिला बचत गटांना देण्यात आली आहेत मात्र त्यातील बहुतेकांची मुदत सह महिन्यापूर्वीच संपलेली आहे आणि आता गुंड टोळ्या पार्किंग वसुलीच्या धंद्यात उतरून बेकायदेशीर वसुली करीत आहेत पालिकेकडे याबाबतच्या तक्रारी येऊनही पालिका लक्ष देत नसल्याने पालिका प्रशासन मध्येच कुणी तरी या गुंडांचा गॉडफादर असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे आश्चर्याची बाब म्हणजे पालिकेच्या वाहतूक विभागाला याची कल्पना असूनही वाहतूक विभाग लक्ष देत नाही. काही कंत्राटदारांनी हे काम उपकंत्राटदारांना दिल्याने पालिकेचे 100 कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप काँग्रेसचे रवी राजा यांनी केला होता पण त्याकडे कुणाचेही लक्ष नाही .

error: Content is protected !!