माटुंगा येथील पलक ज्वेलर्स मध्ये आग चौकशीची मागणी
मुंबई ( दिंनाक 5/5/22) माटुंगा येथील पलक ज्वेलर्स मध्ये आगीची घटना घडली असून पालिकेचे नियम डावलून आत मध्ये मनमानी पद्धतीने जे पुनर्निर्माण केले जाते त्यामुळे अशा घटना घडतात असे या परिसरातील लोकांचे म्हणणे आहे. ज्वेर्ल्सने दोन गळ्यांचा एक गाळा करताना मधलि भिंत तोडली होती शिवाय पालिकेचे नियम डावलून काही बेकायदेशीर बदल केले होते. त्यामुळे अशा घटना घडतात त्यामुळे या आगीची चौकशी व्हायला हवी शिवाय या रहदारीच्या रस्त्यावर फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यानही आगीच्या ठिकाणी जाता आले नाही त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी पलक ज्वेलर्स मधील बेकायदेशीर बदलाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
चौकशी बाजार विभागाकडून होईल काय?
फ्लक ज्वेलर्स व्यवसायिक परवाना आणि आता मध्ये वास्तूत केले फेरबद्दल, माळा अधिकॄत की अनाधिकॄत याची चौकशी बाजार विभागाकडून होणे गरजेचे कारण या इमारतीत पालिका कर्मचारी आणि ंत्याचे कुटुबे वास्तवयास आहे तर मंडईला भेट देण्याची संख्या हजारोत आहे. त्याची सुरक्षता बाबत काय? असा प्रश्न जनतेतून विचारला जातो.
फेरीवाल्याकडून संपूर्ण फुटपाथ अतिक्रमणित
एफ-नार्य अतिक्रमण निमुर्लन विभागाच्या हप्तेखोरीमुळे बेकायदा फेरीवाल्याना संपूर्ण फुटपाथ अतिक्रमणित केली असून आग लागूनही फेरीवाले हटत नाही पाहून शेवटी पोलिसांना पालिका अधिकार्याना बोलावून फेरीवाल्याना हटविण्यात आले. या फेरीवाल्यावर निष्कासन कारवाई कायमची कधी होणार.