भाजपचा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय
मुंबई/ शिंदेंची शिवसेना आणि भाजप महाराष्ट्रात भलेही सातेत असेल तरी आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका भाजपने स्वबळा लावर लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वी दिल्लीत अमित शह आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची एक बैठक झाली होती या बैठकीत शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवायची असा निर्णय घेतला होता .पण आता मात्र भाजप लोकसभेच्या सर्वच्या सर्व ४८ आणि विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवणार असल्याचे समजते त्यासाठी मतदारसंघ निहाय पदाधिकारीही नेमले आहेत. भाजपच्या या भूमिकेमुळे शिंदे गटात संताप आहे त्यामुळे या दोन्ही पक्षात निवडणूकी वरून दरी निर्माण होण्याची शक्यता आहे