ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

शिंजु आबे एक रूढीवादी नेते


सध्याच्या विज्ञान युगात जात धर्म श्रद्धा आस्था या गोष्टींना फारसे महत्व नाही.भारतात ठीक आहे पण जपान सारख्या पुढारलेल्या देशांत सुधा अशा गोष्टींना महत्व दिले जाते आणि भारताप्रमाणे जपान मध्ये सुधा या गोष्टींना महत्व दिले जाते हे तर अविश्वसनीय आहे जपानचे माजी पंतप्रधान शींजू आबे हे धार्मिक होते मोदी बरोबर गंगा आरती करताना त्यांना ज्या पुरोगामी भारतीयांनी पाहिले तेंव्हा त्यांना मोठा धक्का बसला होता.पण शिंजी आबे इतके कट्टर धार्मिक असतील असे वाटले नव्हते.त्यांची हत्या झाल्यानंतर त्यांचा मारेकरी तेट्सुया यामा गामी याने चौकशीत जी माहिती दिली त्यावर विश्वास बसत नाही यामागामी यांच्या मते शिन्जू आबे यांच्या धार्मिक समुदाय मुले त्याची आई आर्थिक दृष्ट्या कंगाल झाली होती म्हणून त्याने शींजु आबे यांची हत्या केली.तशी धार्मिक वादातून यापूर्वीही आशिया खंडातील अनेक बड्या नेत्यांच्या हत्या झाल्या आहेत ज्यात बांगलादेश मुक्ती संग्रमाचे नेते शेख मुजीब उर रेहमान,पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो,भराच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अशा किती तरी नेत्यांची उदाहरणे देता येतील.पण जपान हा सर्वच बाबतीत पुढारलेला देश आहे तसेच तो आर्थिक महासत्ता सुधा आहे असे असताना तिथेही जात धर्म पंथ आस्था यासारख्या गोष्टींना महत्व दिले जाते हे एकूण वाईट वाटले .

शिंजो आबे याना राजकारणाचे बाळकडू त्यांच्या कुटुंबातूनच मिळाले होते त्यांचे आजोबा राजकीय नेते होते नोबुसुके किशी असे त्यांचे नाव होते आणि त्यांची मुलगी योको आबे ही शींजो आबेंची आई होती. तर त्यांचे वडील शिंतरो आबे हे 1958 ते 1991 दरम्यान हाऊस चे सदस्य होते त्यानंतर ते जपानचे परराष्ट्र मंत्री झाले.अशा बड्या राजघराण्यात 1954 सली आबे यांचा जन्म झाला त्यांचे प्रार्थमिक शिक्षण टोकीयो मध्ये झाले तर उच्च शिक्षण अमेरिकेत झाले मात्र तिथले शिक्षण अर्धवट सोडून ते जपानला परतले आणि सुरुवातीला एक स्टील कंपनीत नोकरी करून नंतर राजकारणात आले .त्यांना दोन वेळा जपानचे पंत प्रधान होण्याचा बहुमान मिळाला 2006ते 2007 आणि 2012 ते 2020 जपानच्या पंतप्रधान पदी सर्वाधिक काळ राहिलेले ते पहिलेच पंतप्रधान होते.दक्षिण आशियातील चीनची मुजोरी मोडून काढण्यासाठी त्यांनी भारत,ऑस्ट्रेलिया अमेरिका आदी देशांशी चांगले संबंध निर्माण केले भारताचे तर ते मित्र होते स्वतः शिंजू आबे हे धार्मिक आणि रूढी वादी असल्याने त्यांची मोदींशी मैत्री झाली आणि भारत/ जापान यांच्यात आर्थिक,सांस्कृतिक आणि व्यापारी संबंधांना एक नवा आयाम मिळाला भारताला त्यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अत्यंत अल्प दरात कर्ज उपलब्ध करून दिले . शिनजो आबे एक व्यक्ती म्हणून तसेच एक उत्तम प्रशासक म्हणून आशिया खंडात लोकप्रिय होते पण एकीकडे विज्ञानाच्या सहायाने गरुद्भरारी घेणाऱ्या आणि दुसऱ्या महायुध्दात बेचिराख होऊनही आज आर्थिक महस्त्ता बनलेल्या जपानच्या पंत प्रधान शिन्जो आबेनी रूढी वादी असणे आणि धार्मिक आस्थना वाजवीपेक्षा अधिक महत्व देणे दुर्दैवी होते आणि तेच त्यांच्यासाठी घातक ठरले

error: Content is protected !!