ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

कोणाचे आमदार पात्र कोणाचे अपात्र आज न्यायालयात फैसला


दिल्ली / सरकार आणि शिवसेनेतील उरलेल्या आमदारांचे भवितव्य ठरविण्याच आजच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे . मात्र आज सुनावणी होईल की नाही याबाबत शंका असल्याने या सूनवणीबानातचे सस्पेन्स वाढले आहे
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड केले होते त्यांच्या सोबत शिवसेनेचे 39 आमदार गेले होते त्यानंतर शिवसेनेने शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या विरोधात सभापती झिरवाळ यांच्याकडे तक्रार करून त्यांना अपात्र करण्याची मागणी केली होती .पण शिंदे गटाने झिरवाळ यांच्या विरोधातच अविश्वास ठराव दिला होता तसेच शिवसेनेने सुनील प्रभूना प्रतोद आणि अजय चौधरी यांना गटनेते केले होते . त्याला शिंदे गटाने विरोध करून एकनाथ शिंदे यांना गटनेते तर भारत गोगावले याना प्रतोद केले होते त्यानंतर या दोघांनीही एकमेकांच्या विरोधात विधी मंडळ सचिवांकडे तक्रार केली होती .त्यामुळे विधी मंडळ सचिवांनी या दोन्ही हातांच्या 53 आमदारांवर नोटीस बजावली आहे तर दुसरीकडे शिवसेनेने शिंदे गटाच्या 39 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे अशी मागणी करणारी दोन याचिका दाखल केल्या आहेत आणि या प्रकरणी झालेल्या मागील सुनावणीत दोन्ही गटांच्या पात्र अपात्र फैसला 11 जुलै सुनावणी नंतर केला जाईल असे सांगितले होते आणि म्हणूनच आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष आहे जर न्यायालयाने शिवसेनेने सांगितलेल्या 16 आमदारांना पक्षांतर बंदी कायद्यान्वये अपात्र ठरविले तर उर्वरित 39 आमदारांना अपात्र ठरवण्याची शिवसेनेचा मार्ग मोकळा होईल आणि कदाचित शिंदे सरकार अडचणीत येईल पाण्यातील झिरवाळ प्रकरण न्यायालयाच्या आजच्या लिस्टवर नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!