ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

बिहारमध्ये नितीशकुमारांनी भाजपला सतेतून घालवले

पटना / महाराष्ट्रात शिवसेना फोडून सता मिळवणाऱ्या भाजपला बिहारमध्ये नितीश कुमार यांनी जशास तसे उत्तर देत भाजपला सतेमधून घालवले आणि लालूंच्या राजद च्या मदतीने बिहारमध्ये सता स्थापन केली त्यामुळे बिहारमध्ये आता चाचा नितीशकुमार आणि त्यांचा मानलेला भाचा म्हणजेच लालूंचा मुलगा तेजस्वी यादव या दोघांचे चाचा भतीजा राज आले आहे.
बिहार विधानसभेच्या मागील निवडणुकीत भाजपने 77 तर जेडियुने 42 जागा जिंकल्या होत्या मात्र अगोदर ठरल्या नुसार नितीश कुमार मुख्यमंत्री झाले पण भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने भाजपकडून नितीश कुमार यांना त्रास दिला जाऊ लागला आणि शेवटी त्यांचे आमदार फोडण्याचे षडयंत्र रचले गेले . पण नितीश कुमार यांना चाहूल लागताच ते सावध झाले आणि त्यांनी भाजपची साथ सोडून दुसऱ्यांदा लालुंशी घरोबा केला आणि बिहारमध्ये पुन्हा राजद जेडीयूचे सरकार आले . काल नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची तर तेजस्वी यादवने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि बिहार मध्ये पुन्हा एकदाचाचा भतीजा यांचे सरकार सत्तेवर आले भाजपला हा मोठा हादरा आहे .महारष्ट्र त्याने सेनेल सतेमधून घालवले पण बिहारमध्ये भाजपला त्यांच्याच मित्राने सतेतून घालवले यालाच म्हणतात इट का जवाब पथर .

error: Content is protected !!