ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

सावधान ! मुंबईत कोरोनाचा नवा व्हॅरियंट

मुंबई – जगभरात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी, कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना व्हेरियंटचा भारतात पहिला रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. ब्रिटननंतर आता महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोरोनाच्या नवीन धोकादायक एरिस व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्याने चिंतेचं वातावरण आहे. ब्रिटनसह काही देशांमध्ये काही दिवसांपूर्वीच एरिस कोरोना व्हेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. त्यातच आता देशातही या व्हेरियंटचा रुग्ण सापडला आहे.
कोरोना व्हायरसचा नवीन एरिस व्हेरियंट पहिल्यांदा ब्रिटन (UK) मध्ये आढळून आला, त्यानंतर हा वेगाने पसरत आहे. आता ब्रिटननंतर मुंबईमध्येही कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा रुग्ण आढळून आल्याने धोका वाढला आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट एरिसने सध्या ब्रिटनची चिंता वाढवली असून अनेक कोरोनाबाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत. एरिस व्हेरियंट कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचा सबव्हेरियंट-EG.5.1 आहे, यालाच एरिस असंही म्हटलं जात आहे.
भारतात या एरिस व्हेरियंटचा पहिला रुग्ण मे महिन्यातच सापडला होता. बीजे मेडिकल कॉलेजचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात महाराष्ट्रात नवीन सबवेरियंट आढळून आला होता, मात्र, त्यानंतर जून आणि जुलै महिन्यात या व्हेरियंटचा कोणताही नवीन रुग्ण सापडलेला नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, एरिस कोरोना व्हेरियंटची मुख्य लक्षणे ओमायक्रॉन सारखीच आहेत. यामध्ये घसा खवखवणे, नाक वाहणे, नाक चोंदणे, शिंका येणे, कोरडा खोकला, डोकेदुखी, कफ असलेला खोकला, स्नायू दुखणे आणि वास कमी होणे. दरम्यान, कोरोना रुग्णांमध्ये दम लागणे, वास कमी होणे आणि ताप ही आता मुख्य लक्षणे नाहीत. सध्याच्या खराब हवामानामुळे कोविड प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते, असं मत वॉर्विक विद्यापीठातील विषाणूशास्त्रज्ञ प्रोफेसर लॉरेन्स यंग यांनी व्यक्त केलं.

error: Content is protected !!