राज ठाकरे ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या – उद्धव ठाकरे गटाच्या ८ जणांना अटक
बीड – राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्यापासून त्यांच्या विरोधात ठाकरे गटआणि शरद पवार गट आक्रमक झाले आहेत . दोन्ही गटात आता चकमकी सुरु झाल्या आहेत आज बीड मध्ये उद्राधव ठाकरेंच्जया कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचा ताफा अडवून सुपारीबाज , सुपारीबाज परत जा अशा घोषणा देत त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत . या प्रकरणी ८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे बीड दौऱ्यांवर आले आहेत. यावेळी त्यांच्या ताफ्यासमोर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांचा ताफा आडवून ठेवला. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करणे आवश्यक होते.
परंतु तसे झालेले नसल्याने शिवसैनिक त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचू शकले यानंतर राज ठाकरे ज्यावेळी हॉटेलमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याशी चर्चा करत पोलीस बंदोबस्ता विषयी नाराजी व्यक्त केली. तसेच तुमचे इंटेलिजन्स काय करत होते ?असा सवाल देखील त्यांनी केला. तसेच तेथून थेट गृहमंत्र्यांना फोन लावण्याबाबतही राज ठाकरे बोलले. दरम्यान घटनेनंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे देखील या ठिकाणी दाखल झाले होते त्यांनी या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त वाढवण्याच्या सूचना केल्या