ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महापालिकामुंबई

सणासुदीच्या काळात मिठाई आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करू नका, अन्न व औषध प्रशासन विभागाचा व्यावसायिकांना इशारा- नागरिकांना अशाप्रकारे कुठेही भेसळ आढळल्यास तक्रार करा .

गणेशोत्सव काळात मिठाईला देखील मोठी मागणी होत असते. मात्र अनेक व्यावसायिक हीच संधी साधत मिठाई पदार्थांमध्ये भेसळ करत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग आता सतर्क झाला.
मुंबई : गणेशोत्सव आणि आगामी सणोत्सवाच्या काळात मिठाई आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करू नका तसेच नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहोचेल असे कृत्य केल्यास कठोर कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहा असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाकडून व्यावसायिकांना देण्यात आला आहे. दरम्यान मिठाईमध्ये भेसळ कशी ओळखायची? व्यावसायिकांनी नियमांचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते?

लाडक्या गणरायाचं आगमन झाले असून घरोघरी हा बाप्पा विराजमान होणार आहे. बाप्पाच्या स्वागताची तयारी सर्वत्र जोरदार सुरु असून आकर्षक सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठाही सजून गेल्या आहेत. विशेष म्हणजे गणेशोत्सव काळात मिठाईला देखील मोठी मागणी होत असते. मात्र अनेक व्यावसायिक हीच संधी साधत मिठाई पदार्थांमध्ये भेसळ करत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग आता सतर्क झाला. नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहोचेल असे कृत्य केल्यास कठोर कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहा असा इशारा त्यांच्याकडून व्यावसायिकांना देण्यात आला आहे.

नाशिकच्या सातपूर परिसरातील नाईस हॉलमध्ये सोमवारी अन्न व औषध प्रशासन विभागाची जिल्ह्यातील मिठाई, हॉटेल, किराणा आणि भगर व्यावसायिकांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत त्यांना हा इशारा देत जनजागृती देखील केली गेली. विशेष म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय केला नाही तर पाच लाख रुपयांपर्यंत दंड तसेच कारावास आणि जन्मठेपेची देखील शिक्षा व्यवसायिकांना भोगावी लागणार असल्याने सूचनांचे पालन करा असं आवाहन प्रशासनाकडून केलं जातय.
प्रशासनाकडून मिठाई व्यवसायिकांना देण्यात आलेल्या मुख्य सूचना 
आस्थापनेचा परीसर हा पर्यावरणीय दूषिते व किटकांपासून संरक्षित व स्वच्छ असावा
कच्चे अन्नपदार्थ परवानाधारक/ नोंदणीधारक अन्न, व्यवसायिकांकडून खरेदी करण्यात यावेत
पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा

अन्नपदार्थ हे स्वच्छ व सुरक्षित ठिकाणीच साठवणूक करावेत
आजारी असल्यास अन्न पदार्थ हाताळण्यात येऊ नयेत
मिठाई तयार करतांना केवळ फूडग्रेड खाद्यरंगाचा 100  PPM च्या आतच वापर करावा
मिठाईच्या ट्रे वर दर्शनी भागात वापरण्यायोग्य दिनांक टाकावा
बंगाली मिठाई ही 24 तासांच्या आत खाण्याबाबत पॅकेजिंग मटेरियलवर निर्देश देण्यात यावेत
मिठाई बनवतांना तसेच हाताळणाऱ्या व्यक्तींनी नेहमी डोक्यावर टोपी, मास्क, हातमोजे व स्वच्छ अॅप्रन वापरावे.
मिठाईवर वापरला जाणारा सोनेरी व चांदीचा वर्ख योग्य दर्जाचे व उच्च प्रतीचे असावे
मिठाई हाताळतांना हात वारंवार स्वच्छ धुवावे  
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे

मिठाई अधिक रंगीबेरंगी असल्यास तिच्यामध्ये भेसळ असू शकते तसेच अशा पदार्थांची चवही  वेगळी लागते, अशा प्रकारच्या मिठाई झाकलेल्या अवस्थेत असतात. मिठाईवर चांदीच्या ऐवजी अल्युमिनिअमचा वर्ख असल्यास किंवा अस्वच्छ वाटल्यास त्या खरेदी करू नये.

नागरिकांना अशाप्रकारे कुठेही भेसळ आढळल्यास किंवा तक्रार करायची असल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असून विक्रेत्यांनो काळजी घ्या. 

error: Content is protected !!