ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मणिपूर मध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला ६ ठार

इंफाळ – आरक्षणाच्या मुद्द्यावरून मणिपूर मध्ये दोन जातींमध्ये जो तणाव आहे. तो पुन्हा वाढला आहे. मागच्या वर्षी याच तणावामुळे २०० लोकांचा बळी गेला होता आता सुधा पुन्हा एकदा हा तणाव उसळला आहे . त हिंसाचारात ६ जणांचा बळी गेला आहे.
मानिपुर पुर्न्हा एकदा हिंसाचार सुरु झाला आहे. जिरीबाम येथे सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जिरीबाम येथे ताज्या हिंसाचारात ६ लोकांचा मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, एका व्यक्तीची झोपलेला असताना गोळी झाडून हत्या करण्यात आली. दोन सशस्त्र विरोधी गटांनी परस्परांवर गोळ्या चालवल्या. यात ४ जणांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोरांनी जिल्ह्या मुख्यालयापासून ५ किमी अंतरावर एका निर्जन स्थळी एकट्या राहणाऱ्या व्यक्तीची घरात घुसून हत्या केली. त्यावेळी तो झोपलेला होता. या हत्येनंतर ७ किलोमीटर दूर डोंगरांमध्ये सशस्त्र गटात जोरदार गोळीबार झाला. यात ४ जणांचा मृत्यू झाला.
या आठवड्याच्या सुरुवातीला जाळपोळीची सुद्धा घटना घडली होती. काही लोकांनी एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच रिकामी असलेलं ३ खोल्यांच घर जाळलं होतं. १ ऑगस्टला आसाच्या कछारमध्ये सि आर पी एफ़ च्या देखरेखीखाली एक बैठक झाली. दोन वेगवेगळ्या समुदायाच्या प्रतिनिधींनी सामान्य स्थिती बहाल करण्यासाठी जाळपोळ, गोळीबार रोखण्यासाठी करार केला. त्यानंतर पुन्हा एकदा हिंसाचार झाला
मागच्या वर्षी मे महिन्यापासून आतापर्यंत इम्फाळ खोऱ्यातील मैतेई आणि आणि आसपासच्या डोंगराळ भागात राहणाऱ्या कुकी, अन्य समुदायात जातीय हिंसाचार झाला. त्यात आतापर्यंत २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बेघर झाले आहेत

error: Content is protected !!