संजय राऊत यांची अखेर जामिनावर सुटका
मुंबई/ मनी लॉडरिंग प्रकरणात गेल्या 101 दिवसांपासून तुरुंगात असलेले शिवसेना नेते संजय राऊत याना अखेर आज पी आई ए एल न्यायालयाने 2 लाखांचा जामीन मंजूर केला आणि संजय राऊत यांची जवळपास तीन महिन्यांनी सुटका झाली.
पी आय ए एल न्यायालयाचे न्यायमूर्ती देशपांडे यांच्या न्यायालयात राऊत यांच्या अर्जावर सुनावणी झाली .यावेळी न्या. देशपांडे यांनी ई डी ची कडक शब्दात हजेरी घेतली आणि संजय राऊत याना पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणावर जामीन मंजूर केला . राऊत यांच्या सुटकेचे वृत्त समजताच महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैिकांनी फटाके लाऊन आणि पेढे वाटून राऊत यांच्या सुटकेचे स्वागत केले .त्यानंतर राऊत हे वाजत गाजत त्यांच्या निवासस्थानी पोचले यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की मला 103 दिवस तुरुंगात राहावे लागले आता 103 आमदार निवडून आणणार .