ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

दादर रेल्वे स्थानकात टॅक्सीवाले आणि वाहतूक पोलिसांची मुजोरी

मुंबई/ रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर रेल्वे स्थानकात टॅक्सीवाले आणि वाहतूक पोलीस यांच्या मुजोरी मुळे प्रवासी खूप, हैराण, ,झाले आहेत . कारण दादर पूर्व परिसरात रेल्वे स्थानकाच्या नजदीक,असलेल्या टॅक्सी स्टँड वर जवळची म्हणजेच परेल,नायगाव भोईवाडा येथील भाडी टॅक्सीवाले घेत नाहीत वास्तविक भाडे नाकारणे हा कायद्याने गुन्हा आहे तरी जवळचे भाडे घेतले जात नाही बरे वाहतूक पोलिसांकडे तक्रार करायला गेल्यास ते तक्रार घेत नाहीत . उलट प्रवाशनाच दमदाटी करतात शनिवारी रात्री 10.30 वाजता पत्रकार सोनू जाधव यांनी स्टँड वरच्या एका टॅक्सी चालकाला टी बी हॉस्पिटल जाणा है असे सांगितले पण जवळचे भाडे असल्याने टॅक्सी वाल्याने नकार दिला त्यामुळे जाधव यांनी ट्रॅफिक पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला .पण त्याच वेळी त्या ठिकाणी दुसरा ट्रॅफिक पोलिस आला आणि त्याने जाधव याना दमदाटी करीत धमकी दिली मारण्यासाठी अंगावर धावला . अखेर जाधव याना चालत घरी जावे लागले जाधव यांनी सदर प्रकरणी वाहतूक मांटुगा पोलीस निरीक्षक हरिदास तसेच वाहतूक पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे .

error: Content is protected !!