मविआच्या गाडीच्या ड्रायव्हर सीटवर बसण्यासाठी नेत्यांमध्ये मारामारी- गाडीला ना ब्रेक चाके – पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल
धुळे/महाराष्ट्राच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली ते म्हणाले महाविकास आघाडीच्या गाडीला चाक आहेत ना ब्रेक आहेत त्याचबरोबर ड्रायव्हर सीटवर बसण्यावरून त्यांच्या नेत्यांमध्ये हाणामारी सुरू आहे मग हे लोक महाराष्ट्राचे काय भलं करणार या उलट आमच्या सरकारने महाराष्ट्रातील जनतेसाठी खूप काही केलेले आहे आणि यापुढेही आम्ही करणार आहोत असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी धुळ्याच्या सभेत दिले
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारने गेल्या दोन वर्षात अनेक मोठमोठ्या योजना आणल्या राबवल्या आणि जनतेच्या विकासासाठी जेवढे करायचे तेवढे प्रयत्न केले त्यामुळे हे काम करणाऱ्या लोकांचं सरकार आहे आणि अशाच लोकांना जनतेने पाठिंबा द्यायला हवा देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या विकासासाठी खूप मेहनत घेत आहेत खूप काम करीत आहेत जनतेच्या कल्याणासाठी अनेक नव्या नव्या योजना आणि त्या आहेत आणि केंद्राच्या मदतीने हे डबल इंजिनचे सरकार महाराष्ट्रात सुसाट प्रगती करीत आहे आणि यापुढेही ते प्रगती करीतच राहील त्यासाठी या सरकारच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनतेने खंबीरपणे राहून पुन्हा त्यांना सत्तेत आणायला हवे असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले
