ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

कलम 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत राडा


श्रीनगर/कलम 370 रद्द करावे या भाजपच्या मागणीच्या विरोधात आज सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीचे आमदार अत्यंत संतप्त झाले आणि त्यावरून विधानसभेत घोषणाबाजी सुरू झाली यावेळी नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदाराने 370 कलम रद्द करण्याचा प्रस्ताव मागे घ्या अशा आशयाचे फलक विधानसभेत आणले त्यामुळे चिडलेल्या भाजपा आमदारांनी तो फलक हिसकावण्याचा प्रयत्न केला त्यावरून सत्ताधारी आणि विरोधी भाजपा यांच्यात धक्काबुक्की आणि हाडांमध्ये झाली अखेर धक्काबुक्की आणि हाणामारी करणाऱ्या आमदारांना मार्शलने सभागृहाच्या बाहेर काढले दरम्यान हा मुद्दा विधानसभा अधिवेशनात गाजणार आहे कोणत्याही परिस्थितीत कलम 370 पुन्हा बहाल करण्याचा प्रयत्न सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडी करीत आहे तर आम्ही असे होऊ देणार नाही अशी भूमिका भाजपाने घेतलेली आहे सभागृहातील या राडेबाजीचे आता रस्त्यावर ही पडसाद उठायला सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स च्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी केली तर काही ठिकाणी भाजपच्या लोकांनीही रस्त्यावर उतरून 370 कलम रद्द होऊ देणार नाही अशा घोषणा दिल्या त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे

error: Content is protected !!