भाजपाच्या संकल्प पत्रात घोषणांचा पाऊस शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना
मुंबई/आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपले संकल्प पत्र म्हणजे जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे .या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस पडण्यात आला आहे .त्यामध्ये २०१७पर्यंत लखपती दीदी तयार करण्याची योजना आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी शेतीमालाला हमीभाव देण्याबाबत भावंतर योजना आणण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. प्रत्येक गरिबाला अन्नधान्याचे नियोजन व वृद्ध पेन्शन योजनेत दीड हजार वरून २१०० पर्यंत वाढ करण्यात आली आहे २५ लाख रोजगार निर्मितीचे लक्ष तसेच विद्यावेतनाच्या माध्यमातून दहा लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन महारथीमार्फत मोठ्या लॅब तयार करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करण्यात पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाणार अशा अनेक घोषणा भाजपच्या संकल्प पत्रामध्ये करण्यात आलेले आहे त्या संकल्प पत्रात लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजार वरून करण्याचाही उल्लेख आहे. त्यामुळे आता मतदार कोणाच्या बाजूने जातात महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीला मतदान करतात की भाजपाच्या या संकल्प पत्राच्या बाजूने उभे राहतात ते येत्या २२ तारखेला कळेल