अँटॉप हील येथील बेकायदा चिकन शॉपवर पालिकेची कारवाई
मुंबई/ अँटोप हील च्या कोकरी आगार परिसरात काल पालिकेच्या विशेष पथकाने बेकायदेशीर रित्या चालणाऱ्या सहा चिकन शोपवार कारवाई केली यावेळी दुकानातल्या एका कामगाराने पालिका अधिकाऱ्यांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस घटनास्थळी येताच त्याने पळ काढला
अँटॉप हिल आगर भागात बेकायदेशीर चिकन शोप चालवली जात असल्याची माहिती पालिकेला मिळाली होती सादर माहिती मिळताच पालिकेचे विशेष पथक त्या ठिकाणी पोचले यावेळी सहा चिकन शॉप मध्ये चिकन विक्री सुरू होती मात्र पालिका अधिकारी पोचतच एका शॉप मधील नोकराने पालिका अधिकाऱ्यास हुज्जत घालायला सुरुवात केली तसे बाकीचे लोकही गोळा झाले त्यामुळे पालिका पथकाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला मात्र पोलीस येताच दुकानातील कोंबड्या घेऊन चिकन शोपच्या मालकांनी पळ काढला