ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनरल बिपिन रावत व त्यांच्या पत्नीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार-महायोधा अनंतात विलीन

दिल्ली/बुधवारी तामिळनाडूतील कुननुर येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू मुखी पडलेले सी डी एस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मदुलिका यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात आणि पूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.रावत दांपत्याच्या दोन मुलींनी आपल्या आई वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. आणि भारताचा एक महान लढवय्या सुपुत्र अनंतात विलीनझाले
गेल्या बुधवारी कुंनर येथे लष्कराच्या एका हेलिकॉप्टरला अपघात होऊन त्यात सी डी एस बििपिन रावत त्यांच्या पत्नी मधुमालिनी आणि अन्य ११मिळून १३जनचा मृत्यू झाला होता त्यानंतर त्यांचे पार्थिव काल दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आणि आणि नंतर लष्करी येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते तिथे लष्करी अधिकारी,राजकारणी यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर त्यांची अंतिम यात्रा सुरू झाली यात हजारो लॉक सामील झाले होते आणि बिपिन रावत अमर रहे, भारत माता की जय अशा घोस्ना देत होते त्यानंतर दिल्लीच्या स्मशान भूमीत त्यांच्यावर व त्यांच्या पत्नीवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांना १७ तोफांची सलामी देण्यात आली आणि नंतर त्यांच्या दोन्ही मुलींनी त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या चीतेला मुखगणी दिला

error: Content is protected !!