ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

युट्युबवरील अश्लील जाहिरातीमुळे परीक्षांत नापास झाल्याचा दावा करून ७५ लाख मागणाऱ्याला २५ हजारांचा दंड

मुंबई – युट्युब वरील अश्लील जाहिराती मुळे लक्ष विचलित होऊन पोलीस भरती परीक्षेत मी नापास झालो . त्यामुळे मला ७५ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणारी एक याचिका मुंबई उंचच न्यायालयात दाखल करण्यात आली होती . पण न्यायालयाने ती फेटाळली असून याचिकाकर्त्यालाच २५ हजारांचा दंड ठोठावला आहे

मध्य प्रदेशमधील पन्ना येथे राहणाऱ्या आनंद किशोर चौधरी याने सुप्रीम कोर्टात याचिका केली होती. त्यानं आपल्या याचिकेत म्हटले की, पोलीस भरती आणि राज्य सेवा परिक्षेची तयारी करत होतो. त्यासाठी युट्युबचा वापर करत होता. पण युट्युबवर वारंवार अश्लील जाहिराती येत होत्या. त्यामुळे लक्ष विचलीत झालं अन् परिक्षेत नापास झालो. त्यामुळे गुगल इंडियानं 75 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी.
आनंद चौधरी याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे न्यायमुर्ती संजय कौल आणि अभय ओक यांनी नाराजी व्यक्त केली. न्यायमुर्ती कौल म्हणाले की, ‘तुम्हाला जाहिराती पाहायच्या नसतील तर पाहू नका. याप्रकराच्या याचिका करुन कोर्टाचा वेळ वाया घालवू नका. कोर्टाचा वेळ वाया घालवला म्हणून तुम्हाला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे .

error: Content is protected !!