एस टी कामगारांना वालीच नाही
मुंबई/ गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्याचा हालचालींना आता वेग आला असून काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली या चर्चेत संप मिटवण्याचा दृष्टीने काय भूमिका घेता येईल यावर सविस्तर चर्चा झाल्याचे समजतेे.
सध्या सुरू असलेल्या एस टी संपतील संपकरी विलीनीकरण करण्याच्या मुद्यावर ठाम आहेत तर विलीनीकरण डोक्यातून कडून टाका हे विधानसभेत उपमुख्यमंत्र्यांनी सांगून टाकले आहे सध्या हा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयाच्या आदेशाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल काय येतो यावर या संपाचे भवितव्य अवलंबून आहे .मात्र या संपामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे खूप हाल होत असल्याने संप लवकरात लवकर मितवण्याबाबत सरकारवर मोठा दबाव आहे. त्यामुळे सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबन आणि बडतर्फिची कारवाई सुरू केली आहे मात्र त्यानंतरही संपकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत मात्र बरेचसे कामगार कामावर परतले आहे .सरकारने या संपात तोडगा म्हणून जी पगारवाढ दिली आहे ती बहुतेकांनी मान्य करून कामावर परतले आहेत पण काही लोक मात्र चुकीच्या बातम्या पसरवून कामावर येऊ पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना भडकवत आहेत या सर्व पार्श्वभूमीवर आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा संप मिटवण्याचा दृष्टीने हालचालींना वेग आला आहे.