ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिका कर्मचार्‍यांचा कर्ज घोटाळा उघडकीस – एच डी एफ सी बँकेला लावला 2 कोटी 85 लाखांचा चुना


मुंबई/ बँकांना फसवण्यात ललित मोदी किंवा विजय मल्ल्या हेच शातिर आहेत असे नाही तर आता पालिकेतील सफाई कामगार सुधा बँकेला चुना लावू शकतात हे एका घटनेने उघडकीस आले आहे.पालिकेतील 16 कर्मचार्‍यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे एच डी एफ सी बँकेला 2 कोटी 85 लखणा चुना लावला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दखल करून चौकशी सुरु केली आहे त्यामुळे या कर्मचार्‍यांवर आता नोकरीही गमावण्याची पाळी आली आहे. एच डी एफ सी बँकेच्या अंधेरीतील शाखेत एरिया ऑफीसर म्हणून कर्‍यरात असलेल्या गुरुमित सिंग यांनी बँकेकडे कर्जासाठी आलेल्या अर्जाची छानानि केली असता त्यात काही पालिका कर्मचार्‍यांचे अर्ज सापडले त्या अर्ज सोबत जोडलेले पेपर हे बोगस असून त्याद्वारे 16 पालिका कर्मचार्‍यांनी बोगस दस्तावेज सादर करून बँक कडून 2 कोटी 85 लाखांचे कर्ज उकळले होते . मात्र पालिकेची सलगन असलेल्या बँक व्यवस्थापकाच्या एक पत्र बँकेला मिळाले त्यात संदीप राऊत या सफाई कामगारांच्या झोल सापडत्याचा पंचनामा होता संदीपने सफाई कामगार असताना सुपरवयझर असल्याचे नमूद करून 80 हजार पगार असल्याची बोगस कागदपत्रे जोडली होती आणि कर्ज उकळले होते ही बाब उघडकीस येताच इतर पालिका कर्मचार्‍यांच्या अर्जांची छाननी केली असता त्याची ऐपत नसल्याचे सामोर आले. अशा आणखी 15 कामगारांचे झोल उघडकीस आले यात एच डी एफसी बँकेचा सेलिंग एजंट सुधा जगप्रसाद सामील होता आणि तोच कमिशन घेऊन यांना कर्ज मिळवून देत होता अशी माहिती समजताच त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!