ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

दिल्लीत खाजगी कार्यालये आणि हॉटेल रेस्टॉरंट बंद मुंबईत सर्व सुरू


मुंबई/ सध्या कोरोनचा वेगाने फैलाव सुरू असला तरी कोरना बाबत इतर राज्यांप्रमाणे मुंबई मध्ये कोणताही निर्णय घाई घाईने घेतला जाणार नाही असे काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले .दरम्यान दिल्लीत कालपासून मिनी लॉक डाऊन लावण्यात असला असून सर्व खाजगी कार्यालये तसेच हॉटेल्स रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
देशात कोरोना चे सर्वाधिक रुग्ण देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत आणि आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरात सापडत आहेत या दोन्ही शहरात सरासरी रोज २० हजाराच्या टप्प्यात रुग्ण सोडत आहेत दिल्लीत सोमवारी १९ हजार १६६ नवे रुग्ण सापडले त्यामुळे काल दिल्ली आपाती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व खाजगी कार्यालये तसेच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट तसेच अन्य काही गर्दीची ठिकाणे बंद करून दिल्लीत मिनी लॉक डाऊन लावला आहे .दरम्यान दिल्ली सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात जनतेत असंतोष पसरला आहे कारण एकीकडे आम् आदमी पक्ष दिल्लीत मिनी लॉक डाऊन लावत आहे तर दुसरीकडे पंजाब विधानसभा निवडणुकीच्या रचारसाठी तिकडे सभा आणि मेळावे घेत आहेत त्यामुळे केजरीवाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काही दिल्लीकरांनी केली आहे तर सरकार मात्र रुग्ण संख्येने त्रस्त आहे दिल्लीत संख्येचा वेग २५ टक्क्यांवर पोचला आहे.१५ मे पासून सक्रिय कोविढ प्रकरणांची संख्या ६५८०६ वर पोचली आहे.जी सर्वाधिक आहे.दिल्लीत कोविढ प्रकरणाचा दर ४.१९ तर मृत्यू दर १.६० टक्के आहे.वास्तविक मुख्यमंत्री केजरीवाल हे लॉक डाऊनच विरूद्ध आहे पण आता रुग्ण संख्या वाढल्याने त्यांचाही नाईलाज झाला आहे.
दरम्यान दिल्ली मध्ये जरी मिनी लॉक डाऊन लावण्यात आला असला तरी मुंबईत मात्र इतर राज्यांप्रमाणे कोणताही निर्णय घाई घाईने घेतला जाणार नाही असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
बॉक्स
दोन्ही डोस घेतलेल्या लोकांवर कोरॉनाच जास्त परिणाम नाही
Koronachya प्रादुर्भाव वाढलेला असला आणि दोन डोस घेतलेल्या लोकांनाही पुन्हा कोरोणाची बाधा झालेली असली तरी त्यांना धोका नाही त्यांना केवळ koronachi सौम्य लक्षणे दिसत आहेत त्यामुळे त्यांनी रुग्णालयात दखल होण्याची आवश्यकता नाही असे डॉक्टरांचे म्हणणे आहे मात्र ज्यांचे लसीकरण झाले नाही अशांना koronacha धोका आहे आणि आतापर्यंत अशा चार हजार लोकांचा देशात मृत्यू झालेला आहे

error: Content is protected !!