माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीचा छापा तब्बल १३ तास कसून तपासणी
कोल्हापूर – राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ , अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ आता माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील निवास्थान आणि साखर कारखान्यावर दुसऱ्यांदा ईडी आणि प्राप्तिकर खात्याने संयुक्तरित्या धाड टाकली . तब्बल १२ तास तपासणी सुरु होती. १५८ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी हि छापेमारी करण्यात आल्याचे समजते
कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील तसेच पुण्यातील निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली. ईडी आणि प्राप्तीकर विभागाने एकत्रित ही कारवाई केली. हसन मुश्रीफ यांच्या मुलींच्या घरावरही छापेमारी करण्यात आली. छापेमारी सुरु असताना हसन मुश्रीफ घरी नव्हते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यांमध्ये खळबळ उडाली. गेल्या १२ तासांपासून छापेमारी सुरुच असल्याने समर्थकांनी आंदोलन करून निषेधाच्या घोषणा दिल्या. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी १५८ कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. मुश्रीफ यांनी कोणत्या कारणावरून कारवाई झाली हे माहीत नाही, किरीट सोमय्यांनी नव्याने तेच आरोप केलेत, कारखान्याशी आणि चंद्रकांत गायकवाड यांच्याशी काही संबंध नाही, असा दावा त्यांनी केला. सोमय्यांवर दीड कोटींचे फौजदारी दावे केलेत ते न्यायप्रविष्ठ असल्याचे ते म्हणाले.
मुश्रीफ यांच्यावर झालेल्या कारवाईचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी या कारवाईचा निषेध केला.गेल्या काही दिवसांपासून हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने गैरव्यवहाराचे आरोप करण्यात होत होते. छापेमारी सुरू असताना स्थानिक पोलिसांना याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे तपास यंत्रणांनी दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त आणला होता त्यामुळे छापील आधी सुरू करण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर बातमी वाऱ्यासारखी कागल शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरली.
त्यानंतर नंबर अस्लम शेख यांचा असल्याचे बोलले जाते . एकाच धर्माचे लोकांना टारगेट केल्याचे आरोप राष्टवादी पक्षातील लोकानी केले तर यावर किरीट सोम्मया बोलले की घोटाळेबाजावर कारवाई केली की त्यांना धर्म आठवतो अगोदर त्यांचा धर्म जातो कु ठे ?