ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

शिंदे गटाचा जल्लोष तर ठाकरे गटाची तोडफोड

मुंबई-राहुल नार्वेकर यांनी आमदार पात्र- अपात्रतेवर निकाल देताना शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र करण्यास नकार दिला तसेच खरी शिवसेना शिंदेंचीच आहे असे जाहीर करताच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फटाके लावून तसेच पेढे वाटून आनंद साजरा केला तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारले . वर्ध्यात एसटी बसेसवर दगडफेक केली त्यामुळे वातावरणात तणाव आहे
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना शिंदे यांचीच असा निकाल देताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदार संघातील डोंबिवली शिवसेना शहर शाखेच्या बाहेर शिवसैनिकांनी फटाके फोडत, डीजेच्या तालावर नाचत आनंद उत्सव साजरा केला.
शिवसेना अपात्र निकाल प्रकरणात विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे काय निकाल देतात याकडे आज साऱ्यांचे लक्ष लागले होते. नार्वेकर यांनी शिवसेना शिंदेंचीच निकाल दिला आणि सर्वत्र शिवसैनिकांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला तसेच मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. शिंदे यांचा मतदार संघ आहे .कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर, अंबरनाथ आधी विभागातून डोंबिवलीत शिवसेनेचे पदाधिकारी आले होते. कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश मोरे, राजेश कदम, अभिजित दरेकर यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केला. यावेळी डोंबिवली शहर प्रमुख मोरे यांच्यासह सर्वांनीच बॅंजो वर ठेका धरत डान्स केला. एकमेकांना पेढे भरवत शिवसेना असा एकच जयघोष यावेळी करण्यात आला.

error: Content is protected !!