ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

निर्णयाचे निकष बदलणार नाहीतशरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही तसेच होण्याचे नार्वेकरांकडून संकेत

मुंबई – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘एका वृत्त वहिनीला मुलाखत दिली या मुलाखतीत राहुल नार्वेकर यांना त्यांनी जाहीर केलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी राहुल नार्वेकर यांनी प्रत्येक प्रश्नावर मुद्देसूद उत्तर दिलं. राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच पक्ष मुख्य शिवसेना असल्याचं म्हटलं. तसेच त्यांनी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवली. तसेच दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. राहुल नार्वेकर यांच्या या निकालाची राज्यभरात जोरदार चर्चा आहे. शिवसेना आमदार अपात्रतेचा हाच निकाल राष्ट्रवादी काँग्रेससाठी लागू होणार का? असा प्रश्न नार्वेकरांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
“तो मुद्दा ठरवणं आवश्यक आहे की नाही बघावं लागेल. मला वाटतं निवडणूक आयोगाकडचा निर्णय वादाच्या आधी झाला नव्हता. राष्ट्रवादीचे फॅक्ट वेगळे आहेत, ते बघावे लागतील. मी काही बघितले नाही. पण निकष काही बदलणार नाहीत. कायदा काही बदलणार नाही. पण फॅक्ट्स हे केस टू केस वेगळे असू शकतात. त्या बेसिसवर नियम लागू करावा लागेल”, असं राहुल नार्वेकर म्हणाले.’
तुमच्यावर काही दबाव होता का? या निकालाचा दाखला दिला जाईल म्हणून? असा प्रश्न नार्वेकरांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “प्रथा, परंपरा आणि पायंड्यातून कायदे बनतात आणि विधीमंडळातही बनतात. आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तर तो सर्वत्र लागू होतो. त्यामुळे हा निर्णय गाइडिंग फोर्स आणि बायडिंग फोर्स म्हणून काम करेल. चॅलेंज झाला नाही तर प्रेसिंडेंट बनेल. चॅलेंज झाला आणि तो अपहोल्ड झाला तर तो प्रेसिडेंट म्हणून कॅरिफॉरवर्ड होईल आणि ओव्हरुल झाला तर कोर्टाचा जो निर्णय असेल तो देशाचा लॉ होईल”, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

error: Content is protected !!