भाजपच्या माजी मंत्र्यांकडून मिरजचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख !
मिरज – राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज वादग्रस्त विधान करून एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी सांगली शहरात हिंदू गर्जना सभेत ज्याने भगवाधारी सरकार आणलं त्याचं संरक्षण आम्ही करणार असं म्हटलं आहे. त्याच सभेत माजी मंत्री आमदार सुरेश खाडे यांनी मिरजची थेट मिनी पाकिस्तान म्हणून तुलना केली आहे. यामुळे आता आणखीन वातावरण तापण्याची शक्यता आहे.. तसेच त्यांनी विशाळगडावर कोणतेही धार्मिक कार्यक्रम होऊ देणार नाही, असाही पवित्रा घेतला. त्याच सभेत राणे यांच्याप्रमाणेच खाडे यांनी भाषण केले
.या सभेत खाडे यांनी देशाला हिंदूराष्ट्राकडे नेण्याचा निर्धार बोलून दाखवला. यावेळी ते म्हणाले, मी जातीने चांभार असून दलित आहे. पण हिंदू राष्ट्र निर्मितीकडे जी केंद्राचे पावले पडत आहेत. त्याला आमची साथ आहे. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. हिंदूराष्ट्र व्हावे अशी अनेकांनी इच्छा आहे तशीच आमची मागणी असल्याचे खाडे म्हणाले.
