ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात

लखनौ – उत्तर प्रदेशात भाजपच्या पाठोपाठ कॉंग्रेसनेही आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला . उन्नती विधान जन घोषणापत्र २०२२ या नावाने प्रसिद्ध केलेल्या या जाहीरनाम्यात कॉंग्रेस सत्तेवर आल्यास १० दिवसात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले तसेच २० लाख तरुणांना रोजगार देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे . .
कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आज कॉंगेसचे तिसरे घोषणापत्र जाहीर केले पहिले घोषणापत्र ८ डिसेंबरला जारी केले होते. त्यातही आश्वासने होती. तर २० जानेवारीच्या दुसऱ्या घोषणा पत्रात नारीशक्ती साठी नोकर्यांमध्ये ४० टक्के आरक्षण देले जाईल असे सांगितले होते .आज उन्नती विधान जन घोषणापत्र या नावाने पूर्ण जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय. त्यात १० दिवसात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे .यावेळी बोलताना त्यांनी सांगितले कि आम्ही दिलेला शब्द पाळतो छातीस्गड मध्ये आम्ही दिलेले आश्वासन सत्तेवर येताच पाळले इथेही पाळू असे सांगितले. कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने दिली आहेत त्यात सरपंचाचे मासिक वेतन वाढवणार,शिक्षकांची २ लाख रिक्त पडे भरणार,.कोविड योद्ध्यांना ५० लाखांची मदत देणार ,कोरोनामुळे ज्यांच्या कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाले आहे असणं २५ हजारांची मदत देणार, कारागीर आणि विणकरांसाठी विधानपरिषदेत एक जागा राखीव ठेवणार,दिव्यांगाना दरमहा ३ हजारांची पेन्शन ,पत्रकारांवरील खटले मागे घेणार,सरकारी खात्यातील १२ लाख रिक्त पडे भरणार आणि महिला पोलिसांना त्यांच्याच भागात नियुक्ती देणार अशा प्रकारची आश्वासने कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलेली आहेत.

error: Content is protected !!