ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

बी प्रभाग घनकचरा विभागात मक्तेदार कंत्राटदारांचा पुन्हा बोलबाला

मुंबई (किसनराव जाधव) घनकचरा विभागात सध्या कंत्राट मिळविण्यासाठी घमासन झाली असून मक्तेदार कंत्राटदारांनी कसे प्राप्त होईल त्यासाठी फिल्डींग लावल्याची माहीती सूत्राकडून मिळते. निविदामध्ये एका अटीची बागलबुबा करून अधिकार्‍यानी मक्तेदार संस्थाना पुन्हा कंत्राटे बहाल करणारण्यासाठी डाव खेळलाय गेला का? हा चर्चेचा विषय बनला आहे.
बी प्रभाग घनकचरा व्यवस्थापन खात्यात स्वच्छतेसाठी साफसफाई कामाकरता सामायिक घर गल्ली स्वच्छता, रस्त्यावरील साफसफाई (मेंन मॅपिंग) योजना राबविण्यात येते. प्रभात क्षेत्रात नोंदणीकृत असणार्‍या इच्छुक स्थानिक सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था. बेरोजगार संघ यांच्या मार्फत कामगार पुरवठा कामे करता संस्थेची निवड पात्रता यादी करून सोडत पद्धतीने निवड करण्याची निविदा मागविण्यात येते. साधारणता 4 कोटी रक्मेचे कंत्राट प्रक्रीया दिंनाक 30 जानेवारी 2022 रोज सोडत काढण्यात आली . यात 37 संस्था पात झाल्या. त्यात 22 संस्थाना सोडत काढून कामे देण्यात आली.
मक्तेदार संस्था चालकांच्या दबावाखाली अभिंयता सापडले असल्याने मोजक्या संस्थाना कामे बहाल होताना दिसतात. याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे. उपायुक्त झोन 1 चे संगीता हसनाळे,सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर,प्रमुख अभिंयता (घनकचरा) तायशेट्टे, कार्यकारी अभिंयता आनंद कंकाळ आणि चौधरी अशी मान्यवर लक्ष देतील काय? असा अन्याय झालेल्या संस्थाचा सवाल आहे.

error: Content is protected !!