आई वडिलांविषयी अश्लील कॉमेंट्सयुट्यूबर रणवीरवर गुन्हा दाखल
मुंबई – मी आई- वडिलांचे लैंगिक संबंध बघायचो असे संतापजनक विधान केल्या प्रकरणी देशात संतापाची लाट उसळली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर गुन्हा दाखला करण्याचे आदेश दिले आहेत तसेच मानवाधिकार संस्थेनेही त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे
युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याच्या अडचणींमध्ये आणखी भर पडल्याचं दिसून येतं आहे. कारण आता आसाम या राज्यात रणवीर, आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह, अपूर्वा मखीजा, समय रैना यांच्यासह आणखी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पोस्ट करुन ही माहिती दिली आहेआसाम पोलिसांनी स्टँड अप कॉमेडियन समय रैनाचा शो इंडियाज गॉट लेटेंट च्या नुकत्याच पार पडलेल्या भागामध्ये अश्लीलता पसरवण्यात आली. या चर्चेत रणवीर अलाहाबादिया, समय रैना आणि इतर इन्फ्लुएनसर्स सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात अश्लीलता पसरवल्यासंबंधीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह, अपूर्वा मखीजा आणि इतरांनी अश्लीलता वाढवली आहे. यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं म्हटलं आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सदर कंटेट युट्यूबवरुन हटवण्यासाठी त्यांना नोटीस बजावली आहे. तर रणवीर अलाहाबादिया हा प्रचंड ट्रोल होतो आहे. सोशल मीडियावर रणवीरला लोक प्रचंड ट्रोल करत उपदेशाचे डोस पाजत आहेत.दरम्यान त्याने या प्रकरणी आता जाहीर माफी मागितली आहे
