इडीच्या कारवाईला जातीय रंग देणाऱ्यांना सोडणार नाही- मोदीचां इशारा
मुंबई/ चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला जे यश मिळाले आहे त्या यशानंतर पंत प्रधान मोदी यांनी ईडीच्या कारवाई वर टीका करणाऱ्या नेत्यांना जो इशारा दिला आहे त्यामुळे महा विकास आघाडीमध्ये मोठी खळबळ माजली असून काल शरद पवार यांनी याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली
गुरुवारी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या विजयी मेळाव्यात बोलताना पंत प्रधान मोदींनी सांगितले होते की काही लोक ईडीच्या कारवाईला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत पण अशा भ्रष्ट लोकांना मी सोडणार नाही त्यांच्या बोलण्याचा रोख अर्थातच शरद पवार यांच्याकडे होत कारण नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर पवार म्हणाले होते की आजकाल कुठल्याही मुस्लिम कार्यकर्त्यावर कारवाई झाली की त्याचा दावूद बरोबर संबंध जोडला जातो पण हे चुकीचे आहे तपास यंत्रणांचा अशा तऱ्हेने गैरवापर सहन केला जाणार नाही त्यामुळेच मोदींनी इशारा दिला आहे या इशाऱ्यानंतर काल पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि पुढे काय करायचे याबाबत रणनीती ठरवण्यात आली यावेळी काँग्रेस नेतेही हजार होते